ऐतिहासिक माहिती

ऐतिहासिक माहिती

मौजे चुये हे कोल्हापूर जिल्हयातील करवीर तालूक्यातील दूधगंगा नदी काठी वसलेले छोटेसे गाव आहे. गावाचा इतिहास पहावयाचा झाल्यास गावाचा मूळ पूरुष हे देवगिरीचे रावजी पाटील सन 1152 या साली या ठिकाणी आले व त्यांनी चुये गावाची स्थापना केली. सदर गाव हे कोल्हापूर शहरापासून पश्चिमेकडे 20 किमी. आतंरावर वसलेले आहे.

गावाचे ग्राम‌दैव‌त‌ श्री. जोतिर्लींग‌ गाव‌च्या म‌ध्यव‌र्ती ठिकाणी उभारलेले आहे. मंदीरच्या ज‌व‌ळ‌च‌ श्री विठ्ठल‌ रुक्मीनी मंदीर उभारलेले आहे. मंदीराचे बांध‌काम‌गावातील‌च‌ एक‌ सामाजीक‌ व्य‌क्तीम‌त्व‌ अस‌लेले श्री. श्रीप‌त‌राव‌ पाटील‌ यांनी बांध‌लेले आहे गावाम‌ध्ये गेली साठ‌ व‌र्षे ह‌रिनाम‌ सप्ताह‌ चालु आहे.

याम‌ध्ये अखंड‌ दिव‌स‌ ज्ञा‍नेश्व‌री पाराय‌ण‌, भ‌ज‌न‌, किर्त‌न‌ प्रव‌च‌न‌ व‌ म‌हाप्रसादाचे कार्य‌क्रम‌ होत‌ आस‌तात‌.तसेच‌ गेली 12 वर्षे गावाम‌ध्ये श्री. संत‌ बाबा म‌हाराज‌ आर्वीक‌र यांचा साध‌ना म‌होत्स‌व‌ गावातील‌ त‌रुण‌ व‌र्ग‌ मोठ्या उत्साहाने साज‌रा क‌रतात‌. त‌सेच‌ दुध‌गंगा न‌दी काठी उभारलेले श्री. गुरुदेव‌ द‌त्त‌ मंदीर स‌न‌ 2005 म‌ध्ये अक्ष‌य‌ तृतीया या शुभ‌म‌हुर्ताव‌र श्री. गुरूदेव‌ दत्त‌ मुर्तीची प्रतिष्ठाप‌णा क‌रणेत‌ आली. तद्-नंत‌र प्रतीवर्षी प्रतिष्ठाप‌णा व‌ द‌त्त‌ ज‌न्मोत्स‌व‌ मोठ्या उत्साहात‌ साज‌रा क‌रण्यात‌ येतो. तसेच गावाम‌ध्ये स‌न‌ 2008 पासुन‌ गैबी देव‌स्थान‌चा श्री. ग‌हिनीनाथ‌ उरुस‌ मोठ्या उत्साहात‌ तीन‌ दिव‌स‌ साज‌रा क‌रण्यात‌ येतो. या म‌ध्ये विविध‌ कार्य‌क्रम‌ आयोजीत‌ क‌रुन‌ नाग‌रीकांचे व‌ येणा-या भाविकांचे म‌नोरंज‌न‌ केले जाते.